Ad will apear here
Next
‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता
मुंबई : ‘लेनदेनक्लब’ ही वेतनधारक कर्जदारांना कर्ज देणारी ऑनलाइन बाजारपेठ आहे. या कंपनीला आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन प्राप्त झाले आहे, यामुळे या कंपनीला आता बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून व्यवसाय करता येणार आहे.

‘लेनदेनक्लब’चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविन पटेल म्हणाले, ‘बिगरबँकिंग वित्तीय कंपनी ‘पीटूपी’ म्हणून नोंदणी होणे ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक ना एक दिवस नक्की नियमन कंपनी होऊ, या आशेवर आम्ही सुरुवात केली. त्या काळाच्या तुलनेत आताची वेळ म्हणजे एकदम वेगळे युग आहे. या प्रक्रियेमुळे लेनदेन क्लब एक ब्रँड म्हणून अधिक समर्थपणे सेवा देऊन कर्जदारांचा विश्वास वाढवणार आहे.’

‘लेनदेनक्लबची २०१५मध्ये मुंबईत स्थापना झाली. कंपनीला भारताच्या ‘पीटूपी’ कर्ज क्षेत्रात बाजारपेठेत अग्रेसर व्हायचे आहे. हा उद्देश लक्षात घेऊन व्यवसायाचे मॉडेल तयार करण्यात आले आहे. कंपनी सध्या भारतातल्या पाच शहरांमध्ये कार्यरत असून, लवकरच अधिक शहरांमध्ये प्रवेश केला जाईल आणि हळूहळू संपूर्ण भारतभरात कंपनीची उपस्थिती असेल,’ असे पटेल यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZOQBQ
Similar Posts
‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो दराबाबत ‘जैसे-थे’ धोरण ठेवले असून, चलनवाढीतील आर्थिक स्लीपेजेस, क्रूड मूल्यातील बदल आणि व्यापारास संरक्षण अशा विविध चढत्या आर्थिक जोखीमी लक्षात घेता तटस्थ भूमिका स्वीकारली आहे.
रिझर्व्ह बँकेतर्फे एटीएमच्या सुरक्षिततेचे नियोजन मुंबई : कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (सीएटीएमआय) भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे २१ जून रोजी जारी केलेल्या व एटीएमसाठी नियंत्रण उपाय अनिवार्य करणाऱ्या परिपत्रकाचे स्वागत केले आहे; तसेच बँकेच्या नावाने ब्रँडेड असलेल्या सर्व एटीएमच्या सुरक्षेसाठी येणारा अतिरिक्त खर्च बँकांनी उचलावा, असा प्रस्ताव ठेवला आहे
‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’ मुंबई : ‘बाजारपेठेमधील रोखीच्या तरलतेची स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँकेद्वारा तीन खुल्या बाजारपेठेचा पर्याय (ओएमओ) उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच बँकांनी त्यांच्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरामद्धे वाढ करण्यास सुरुवात केली असून बँक ऑफ महाराष्ट्र देखील नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करेल,’ असे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए
‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मुंबई : ‘फेअरसेंट.कॉम’ या भारतातील सर्वात मोठ्या ‘पी२पी’ कर्ज मंचाला भारतीय रिझर्व बँकेकडून (आरबीआय) ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र मिळाले आहे, ज्यामुळे या उद्योगातील त्यांचे स्थान अग्रणी असल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय नियामकाकडून ‘एनबीएफसी-पी२पी’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त ‘फेअरसेंट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language